07:02pm | Apr 19, 2022 |
सातारा : सातारा जिमखाना क्रिकेट अकादमीतर्फे युवा क्रिकेटपटूंसाठी दि. २४ एप्रिलपासून उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवरील मैदानावर दि. १५ मे पर्यंत शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिमखाण्याचे अध्यक्ष सुधाकर शानभाग यांनी दिली आहे.
दरम्यान, शिबिरार्थींना यावेळी माजी रणजी खेळाडू हे खेळाडूंना मार्गदर्शन करतील. शिबिरात दहा वर्षांवरील मुलांना प्रवेश देण्यात येणार असून त्यांना सकाळी ७ ते ९ यावेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजी माजी क्रिकेटपटूंसह जिमखण्याचे सर्व सभासदांसह या शिबिरात शंभर युवा खेळाडू सहभागी होतील, असे माहिती विनोद वांद्रे यांनी दिली.
यावेळी सातारा जिमखान्याचे सभासद दीपक पाटील, अरविंद पटेल, तानाजी गायकवाड, विनोद वांद्रे, निलेश गोयल, अनिल कदम, दीपक जाधव, आशुतोष जोशी, प्रभू तांबोळी, प्रशांत बागल, दिनेश पटेल हे सर्व सभासद उपस्थित होते.
असे आहेत गेस्ट कोच
सातारा जिमखाण्याचे माजी खेळाडू आणि महाराष्ट्र रणजीपटू अफजल पठाण, मुंबईचे माजी रणजी खेळाडू महेश कारंजकर, विशाल भिलारे, सुनील गाडेकर, निलेश गोयल, विनोद वांद्रे, अरविंद पटेल, दीपक पाटील, अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व होतकरू खेळाडूंना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
विशाल महाडिक प्रशिक्षण देणार
मुंबई रणजी संघाचे माजी खेळाडू आणि विद्यमान कोच विशाल महाडिक यांची या शिबिराला उपस्थिती राहणार आहेत. युवा खेळाडूंना त्यांच्या कोचिंगचा फायदा भावी आयुष्यात निश्चितच होणार आहे. क्रिकेटच्या खेळातील बारकावे लहान वयातच मुलांना समजले तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.
शशी साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभणार
पुणे येथील आयपीलच्या सर्वच सामन्यात आपले योगदान देणारे खेळाडू शशी साळुंखे या युवा खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंची तयारी कायमच वर्षभर करून घेतली जाणार आहे. परंतु, उन्हाळी शिबिरात क्रिकेटमधील बारकावे आणि कला शालेय मुलांनी शिकण्यासाठी हे उन्हाळी शिबीर निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रशिक्षण शिबिरासाठी नावनोंदणी
1) ज्योती स्पोर्ट्स वर्ल्ड, छत्रपती शाहू स्टेडियम व्यापारी संकुल. 2) कृष्णा हार्डवेअर, देगाव फाटा येथे संपर्क करावा. व्यक्तिगत संपर्कासाठी - अरविंद पटेल मो.नं- ८६९८६६७७८८, विनोद वांद्रे मो.नं- ९८२२५३७५७७, प्रभू तांबोळी मो. नं -९८२३३२३०२३ या नंबरवर संपर्क साधून अधिकची माहिती घ्यावी व आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन सातारा जिमखान्याच्यावतीने करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |