11:59pm | Apr 01, 2019 |
महाबळेश्वर : येथील पर्यटन वाढीचा वेग वाढावा म्हणूनच रेंट बाईकचा विषय मी धसास लावला. तसा महाबळेश्वर परिसरातील १४ गावांच्या गावठाणांच्या विषयावर निर्णय घेतला जाईल. कासप्रमाणे वेण्णा लेकची जल क्षमता वाढ करू, जेणे करून महाबळेश्वर -पाचगणी व मार्गावरील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल, मी कायमस्वरुपी सर्वसामान्यांसोबत आहे, असे ठोस आश्वासन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिले.
महाबळेश्वर येथे झालेल्या टुरिस्ट टॅक्सी युनियन व घोडेवाला संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे सातारा लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ ही बैठक झाली. माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष इरफान कुरेशी, नासिर पन्हाळकर, पंकज नायडू, काँग्रेसचे सरचिटणीस सलीम बागवान, विकास शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, सनी मोरे, ऋषिकेश वायदंडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत प्रारंभी विविध वक्त्यांनी स्थानिक प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी उदयनराजेंनी लक्ष घालावे, अशी विनंती व्यक्त केली. महाबळेश्वरमध्ये 'रेंट बाईक' येऊ घातल्या होत्या. त्यामुळे टुरिस्ट टॅक्सी चालक व कुटुंबियांवर बेकारीची कु-हाड कोसळण्याची भिती होती. उदयनराजेंमुळेच प्रशासनाला हा निर्णय रद्द करावा लागला, अशी आठवण विकास शिंदे यांनी सुरवातीला भाषणात सांगितली. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले,. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या भागास भेडसावतोय. कासप्रमाणे वेण्णा लेकची क्षमता वाढवल्यास सायफन पद्धतीने पाणी मिळेल. महाबळेश्वर-पाचगणीचा पाणी प्रश्न सुटेल. स्थानिकांना तसेच पर्यटकांना मुबलक पाणी मिळेल."मेटगुताड, भिलार, क्षेत्र महाबळेश्वर अशा १४ गावांच्या गावठाणाचा प्रश्न आहे. त्यावर आचारसंहिता संपल्यानंतर संबंधीत गावांतील प्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल".
रशियामध्ये अराजकता माजली आणि त्या संघराज्याचे तुकडे झाले. भारतावर घोंघावणारे असे संकट टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराने विचार करुन निर्णय घ्यावा. मतदार लोकशाहीतील राजा असल्याने तोच या देशाचा तारणहार आहे, असेही श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. चोविस तास नेटवर्कमध्ये असणारा नेता म्हणजे उदयनराजे आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करुन त्यांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे, असे आवाहन विराज शिंदे यांनी केले. टॅक्सी युनियनचे सरचिटणीस सी. डी. बावळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी टुरिस्ट टॅक्सी युनियन, गाईडस् संघटना, घोडेवाले संघटनेतर्फे श्री. छ. उदयनराजेंचा सत्कार करण्यात आला. विजय भिलारे यांनी सूत्रसंचालन केले.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |