03:53am | Feb 15, 2020 |
महाबळेश्वर : भिलार, ता महाबळेश्वर येथील केंब्रिज हायस्कुलच्या विद्यार्थाना अश्लिल चित्रफीत दाखवल्या कारणाने व वेळोवेळी मारहाण केल्याप्रकरणी केंब्रीज हायस्कुलच्या दोन शालेय कर्मचार्यांविरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज भिलारे रा सोमर्डी, ता. जावळी, व स्वप्नील कदम रा, कळमगाव ता. महाबळेश्वर यांच्यावर पालक तानाजी शांताराम साबळे, रा. निमगिरी, ता. जुन्नर जि. पुणे यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 11 पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी सातारा पोलीस ठाण्यात केब्रिज हायस्कुलच्या शालेय कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तो झीरो नंबरने पाचगणी पोलीस स्टेशनला हस्तांतरीत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, भिलार येथील केंब्रिज हायस्कूलची अदिवासी शाळा आहे. या शाळेतील 13 विद्यार्थी शाळेच्या त्रासांला कंटाळून भोसेच्या डोंगरातून पळून जाताना जागरुक नागरीकांना दिसले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्या मुलांना गाडीमध्ये घेवुन पाचगणी पोलीस ठाण्याच्या तांब्यात देण्यात आले. भिलार येथील केंब्रिज हायस्कुलचे हे 13 विद्यार्थी भोसेच्या डोंगरातून जाताना भोसे गावचे युवक अजित गोळे, तुषार गोळे, कुलदीप गोळे, लखन गोळे या युवकांना दिसले होते. यानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात आणल्यावर 11 आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर होणार्या तक्रारींचा पाढा वाचुन दाखवताना शिक्षक भितीवर डोके आपटतात, बांबुने मारतात, जेवन वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी पोलीस ठाण्यात मांडल्या. पांचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी या मुलांना जिल्हा बालसंरक्षण अधिकार्यांच्या तांब्यात देणार असल्याची माहीती दिली. पाचगणी पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांचे जाबजवाब नोंदवून पुढील कार्वावाही करीता अहवाल जिल्हा संरक्षण अधिकार्यांकडे पुढे पाठण्यात आले. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांनी चैाकशी करुन पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सातारा पोलीस ठाण्यात केंब्रिज हायस्कुलच्या दोन शालेय कर्मचार्यां विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तानाजी शांताराम साबळे रा. निमगीरी, ता जुन्नर, जि. पुणे या पालकाने फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये स्वप्नील कदम रा. कळमगाव ता. महाबळेश्वर व सुरज भिलारे रा. सोमर्डी, ता. जावली अशी शालेय कर्मचार्यांची नावे आहेत अधिक तपास उपविभागीय अधिकारी अजित टिके करत आहेत.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |