सातारा : महाबळेश्वर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम स्तुत्य असून स्वच्छता मोहिमेसोबतच प्लास्टिक बंदीचा घेतलेल्या निर्णय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा डॉ. आ. नीलम गो-हे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर समितीचे सदस्य आ. रामभाऊ वडकुते, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार मिनल कळसकर, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, अवर सचिव उमेश शिंदे आदी उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा डॉ. आ. नीलम गो-हे यांनी महाबळेश्वर नगरपालिकेस शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. पालिकेच्या कै. भाऊसाहेब माळवदे सभागृहातील छ. शिवाजी महाराजांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन डॉ. आ. नीलम गो-हे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या सोबत असलेले विधानपरिषद विशेषाधिकार समिती सदस्य आ. रामभाऊ वडकुते यांच्यासोबत उपस्थित होते.
महाबळेश्वर सारख्या जगप्रसिध्द प्रेक्षणीय स्थळाला पर्यटनस्थळाचा ''दर्जा'' बाबत आपण स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांच्या सोबत पालिका पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करू असे नमूद केले. पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत नागरिकांसोबतच महिला बचतगटांचा सहभाग, प्लास्टिक बंदी सारख्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. महाबळेश्वर पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांची इत्यंभूत माहिती असलेले संकेतस्थळ विकसित करावीत अशी सूचना मांडली व अद्वितीय निसर्ग सौंदर्य लाभलेल्या महाबळेश्वर या पर्यटनस्थळांची ''दूत'' म्हणून मला काम करायला नक्कीच आवडेल असे नमूद करून ''इंक्रिडिबल महाबळेश्वर'' सारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासन आपल्या पाठीशी आपण स्वतः याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू नमूद केले. प्रथम नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पालिकेचा स्वप्नवत प्रकल्प असलेल्या वेण्णालेक सुशोभीकरण, तसेच पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली व शासनाच्या आधी राज्यात महाबळेश्वर पालिकेने प्रथम संपूर्ण प्लास्टिक बंदी केल्याचे नमूद केले. समितीचे सदस्य आ. रामराव वडकुते यांनी मार्गदर्शन करताना महाबळेश्वर पालिकेच्या प्लास्टिक बंदीचे मॉडेल राज्याने घेतले असे सांगून महाबळेश्वर पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे महाराष्ट्रात विकासाचे रोल मॉडेल ठरतील असा विश्वास व्यक्त केला. महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पेपरबॅग आ.गो-हे यांना दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केले तर आभार कुमार शिंदे यांनी मानले यावेळी नगरसेवक कुमार शिंदे,रवींद्र कुंभारदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या दालनात पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेल्या पालिकेच्या वेण्णालेक सुशोभिकरणाच्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आ गो-हे यांनी या प्रस्तावाबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सूचना मांडल्या.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |