महाबळेश्वर : महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर मध्ये गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक 'ओवरफ्लो' वाहू लागले आहे. शनिवारी पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहावयास मिळाले.दरम्यान महाबळेश्वर -पांचगणी मुख्य रस्ता काहीकाळ जलमय झाल्याने वाहातूक धिम्यागतीने सुरु होती.
महाबळेश्वर व तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरकरची जीवनवाहिनी असलेले नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक तुडुंब भरले असून शनिवारी पहाटे सांडव्यावरून पाणी वाहू लागले.जून महिन्याच्या प्रारंभी शहर व परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरु होता मात्र जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाची धुवाँधार बॅटिंग महाबळेश्वर तालुक्यात पाहावयास मिळाली.येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने महाबळेश्वर पांचगणी मुख्य रस्ता जलमय झाला काहीकाळ वाहतूक धिम्यागतीने सुरु होती.वीकेंड असल्याने असंख्य पर्यटक या पर्यटनगरीत दाखल झाले असून येथील पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.येथील प्रसिद्ध वेण्णालेकवर पर्यटकांची गर्दी झालेली पाहावयास मिळाले हौशी पर्यटक भर पावसात भिजताना सेल्फी घेताना दिसत होते यासोबतच गरमागरम मॅककाणीस पॅटिस वर ताव मारताना तर काही भर पावसात घोडे सवारी करताना नवदाम्पत्य तरुण तरुणी दिसून आले.मुख्य बाजारपेठेत देखील पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती येथील प्रसिद्ध चप्पलस,जॅम जेली फज सह उबदार कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा काळ होता.येथील केट्स पॉईंट घाटातील धबधबे ओसंडून वाहत असून पर्यटक अश्या ठिकाणी आधीक वेळ घालवताना पाहावयास मिळत आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्रच गेल्या आठ दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नद्या ओढे,नाले,ओसंडून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पाऊसामुळे झोडे उन्मळून पाडण्याचे संरक्षक भिंत कोसाळ्यण्याचे प्रकार घडले आहेत.हवमान खात्याच्या माहितीप्रमाणे महाबळेश्वर व परिसरात शुक्रवारी सकाळी ८. ३० ते शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत १५०.६ मिमी,तर शनिवारी सकाळी ८.३० पासून ५.३० पर्यंत ७१.२ मिमी पावसाची नोंद झाली असून आज अखेर १४६७. ५ मिमी ५८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |