10:03pm | Dec 02, 2022 |
सातारा : सातारा - पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर नवीन पुलाच्या कामाजवळ अंदाजे ३६ लाखाचा मुद्देमाल घेऊन मुंबईकडे घेऊन निघालेल्या कंटेनरला अनोळखी इसमांनी चारचाकी गाडी आडवी मारून चालकास मारहाण करून मुद्देमालासह कंटेनर व मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती.
या घटनेतील आरोपींचा सुमारे २० किलोमीटर थरारक पाठलाग करून भोर जि.पुणे परिसरात अवघ्या २४ तासाच्या आत या तिन्ही संशयीत आरोपीस बेड्या ठोकण्यात पोलीस निरीक्षक महेश इंगळे व खंडाळा पोलिसांना यश मिळाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चेन्नई वरुन कापडाचे बंडल व इतर साहित्य घेऊन मुंबईला जात असताना 30 नोव्हेंबरला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील एस आकाराच्या कॉर्नर वर कंटेनरला (क्रमांक एमएच ०४ एलई ०२८१) पाठिमागुन येणाऱ्या अनोळखी तीन इसमांनी आपली इको कार (क्रमांक एमएच १२ एसएल ३६८६) आडवी मारून चालक मुहम्मद इस्तेखार इमरान (वय २२, मुळ रा. सेहुडा, ता. खलीलाबाद, जि. संत कबीरनगर. (उत्तरप्रदेश) सध्या रा. वडाळा, मुंबई) यास मारहाण करून, मोबाईल व मुद्देमालासह कंटेनर जबरदस्तीने घेऊन पोबरा केल्याची घटना घडली होती.
यानंतर खंडाळा पोलिसांनी बुलेटवरून सुमारे २० कि.मी. थरारक पाठलाग केला. मात्र आरोपीही १०० किमी. वेगाने गाडी पळवत होते. यावेळी दुसरी गाडी बोलावून यातील एकास पोलीसांनी तत्काळ ताब्यात घेतले, तर इतर दोन्ही आरोपींना २४ तासाच्या आत जेरबंद केले.
या गुन्हयात आरोपी विकास प्रकाश साळेकर वय २८ व रोहिदास महादेव साळेकर वय - ३८ (दोघेही रा. वडतुंबी, ता. भोर, जि.पुणे), गोकुळ शंकर सणस (वय ३४ रा. रावडी, ता. भोर, जि.पुणे) यांना मोठ्या शिताफीने पोलीसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील कंटेनर ट्रक, मोबाईल व इको कार असा ७५ लाख १५ हजार ८२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाई मध्ये खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर, पोलीस पिसाळ, फरांदे, धुमाळ, जाधव, कुंभार, मोरे व भोसले यांनी सहभाग घेतला.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |