02:17pm | Mar 18, 2024 |
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्याबाबत भारतीय बँकांना इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत काही भारतीय बँकांवर सायबर हल्ले वाढू शकतात, अशी भीती सेंट्रल बँकेने व्यक्त केली आहे. या अलर्टसोबतच रिझर्व्ह बँकेने बँकांना सायबर सुरक्षा सुधारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बँकेने काही बँकांना सायबर हल्ल्यांच्या वाढत्या जोखमांसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच, धोका कमी करण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचा सल्लाही दिला आहे. या इशाऱ्यासोबतच, रिझर्व्ह बँकेने बँकांना सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर काम करणे आवश्यक आहे, हे देखील सांगितले आहे.
सेंट्रल बँकेने घेतला आढावा :
आरबीआय ने अलीकडेच जोखीम हाताळण्यासाठी बँकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सायबर सिक्युरिटी आणि माहिती तंत्रज्ञान परीक्षा घेतली जाते, ज्याला CSight असेही म्हणतात. CSight मध्ये विविध बँकांची आपत्ती व्यवस्थापन तयारी, इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मची क्षमता, फसवणूक शोधण्याची यंत्रणा इत्यादी तपासल्या जातात.
डिजिटल बँकिंगमुळे जोखीम वाढते :
डिजिटल बँकिंग वाढल्याने सायबर हल्ल्यांचे धोकेही वाढले आहेत. यासाठी सायबर आणि आयटीचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज आहे. CSight अंतर्गत आरबीआयची तपासणी पथके सर्व बँकांच्या IT प्रणालीची कसून तपासणी करतात. तपासादरम्यान, त्या गोष्टी ओळखल्या जातात, ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर बँका कशा सुरक्षीत ठेवायच्या, याबाबत सल्ला दिला जातो.
यापूर्वीही इशारा देण्यात आला :
रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही बँकांना सायबर धोक्यांपासून सावध केले आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात म्हटले होते की, बँकिंग क्षेत्राने नवीन सायबर धोक्यांसाठी तयार राहावे. 9 फेब्रुवारी रोजी 19 व्या बँकिंग तंत्रज्ञान परिषदेत ते बोलत होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |