11:26am | Dec 15, 2023 |
सातारा : मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात खूपच चांगली प्रगती झाली आहे. परंतु घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमूळे या घटकातील मुला - मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून त्यांच्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज योजना पुन:श्च सुरू करण्यात येत असून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली.
देशातील व विदेशातील उच्चशिक्षणासाठी ही योजना आहे. देशातर्गंत शिक्षणासाठी 30 लाख व विदेशातील शिक्षणासाठी 40 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा असेल. यासाठी महामंडळामार्फत शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थी निहाय निधी एन.एस.एफ.डी.सी. कडून मिळणार आहे. विदेशातील शिक्षणासाठी 3 लाख रुपये एवढी उत्पन्न् मर्यादा आहे. 10 लाख रुपयांपर्यत कर्ज परतफेडीचा कालावधी 10 वर्षाचा तर त्यापेक्षा जास्त कर्जाचा परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा राहिल. शिक्षण पूर्ण घेऊन 6 महिन्यांची किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे आधी होईल तेव्हापासून कर्ज परतफेड सुरु करायची आहे . व्यावसायिक, वैदयकीय, तंत्रशिक्षण यासह इतर अभ्यासक्रमांचा समावेश या योजनेत केला आहे. अभ्यासक्रमाची अधिक माहितीसाठी https://www.nstdc.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी. अधिक माहितीसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, उड्डाणपुलाजवळ एम.आय.डी.सी.रोड, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे, यांनी केले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |