08:57pm | Jul 12, 2023 |
सातारा : लोणंद पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड करीत तीन दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या गुन्ह्यातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुनीत सुरेश दुरगुडे वय 28 रा. लोणंद तालुका खंडाळा, वैभव गोपाळ गोवेकर वय 20 राहणार कोरेगाव तालुका फलटण आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लोणंद शहरातील तसेच फलटण रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात तीन संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक असून या संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर त्यांनी चोरी केलेल्या मोटरसायकली दाखवून त्या मोटरसायकली तपास कामी जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितांकडून मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार चंद्रकांत काकडे, संतोष नाळे, पोलीस नाईक नितीन भोसले, श्रीनाथ कदम, सर्जेराव सूळ, अमोल पवार, सतीश दडस, अभिजीत घनवट, केतन लाळगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मेघा ननवरे यांनी सहभाग घेतला.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |