खंडाळा : शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमधून दि.१३ ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी इको हे वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी महेश उत्तम गायकवाड यांनी दिली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी राजकुमार भुजबळ, गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय कौशल्यपूर्ण असा तपास करत अवघ्या चार दिवसांच्या आत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अजयसिंग अर्जुनसिंग दुधनी वय २१ रा. ७२ वस्ती पाण्याची टाकी,मांजरी बु. हडपसर व बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड, वय २२, रा.श्रीसाई सोसायाटीसमोर बिराजदारनगर हडपसर,पुणे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याप्रकणी सदर वाहनाचा व आरोपींचा शोध सुरू असताना शिरवळ पोलिस स्टेशनचे डीबी पथकातील अधिकारी यांना सदर इको वाहन हे मांजरी बू. या ठिकाणी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सतिश अंदेलवार, पो.ना.नितीन महांगरे, पो.कॉ. प्रशांत वाघमारे व मंगेश मोझर यांनी तेथील स्थानिक हडपसर पोलिस स्टेशनच्या मदतीने आरोपींना पकडण्यासाठी आपले जाळे लाऊन ठेवले होते. रात्रीच्या वेळी हे वाहन घेवून जाण्यासाठी हे आरोपी आले असता त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटक केल्यानंतर हे आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तसेच त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये तब्बल ३३ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले.
सदर कामगिरी ही अजयकुमार बन्सल पोलिस अधीक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अप्पर पोलिस अधीक्षक, तानाजी बरडे उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक सतिश आंदेलवर, पो.हवा.सचिन वीर यांच्याद्वारे करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करत आहेत.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |