12:57pm | Aug 23, 2023 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील शिरवळ शहरालगत असणार्या राष्ट्रीय महामार्गावरील एका लॉजमध्ये कुंटणखाना चालविणारे दोघेजण ताब्यात घेण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी विनोद गोविंद अग्रवाल वय 52 वर्षे राण धनगरवाडी, शिरवळ, ता. खंडाळा आणि एका महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर चालणार्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्याअनुशंगाने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांना सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर चालणार्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. दि. 22 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दोन इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील शिंदेवाडी ता.खंडाळा जि.सातारा हद्दीतील गोकुळ लॉजवर वेश्यागमनाकरीता मुली ठेवल्या आहेत व ते मागणी केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांचे पथकास बातमीच्या ठिकाणी शिरवळ पोलीस ठाण्याच्या मदतीने जावून छापा टाकण्याचा आदेश दिला. पथकाने प्राप्त माहितीच्या ठिकाणी जावून शिरवळ पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने छापा टाकून वेश्यागमनाचा मोबदला स्वत:च्या उपजिविकेसाठी स्विकारुन, पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उद्युक्त करुन, वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून, वेश्या व्यवसायास प्रेरणा देणार्या एक इसम व एक महिला असे दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्या विरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने शिरवळ पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार दिपक मोरे, अतिश घाडगे, राम गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, लैलेश फडतरे, मोहन पवार, गणेश कापरे, पंकजा जाधव, मोनाली निकम, माधवी साळूंखे, क्रांती निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, दलजित जगदाळे, शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस अंमलदार जितेंद्र शिदे, सचिन वीर, सचिन मोरे यांनी केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |