12:49pm | Oct 13, 2022 |
उत्तराखंड : एका खाण माफियाला पकडण्यासाठी उत्तराखंडला गेलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तुकडीवर भयंकर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यादरम्यान पोलिसांवर गोळीबार करण्यात आला नंतर त्यांना पकडण्यात आलं आणि अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये एकूण 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत तर 2 पोलीस कर्मचारी हे बेपत्ता आहेत.
13 सप्टेंबर रोजी जफर नावाच्या एका खाण माफियाने पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अभद्र वर्तन केलं होतं. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संतापले होते. यामुळे मुरादाबाद पोलिसांनी जफरसह अन्य काही जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून जफर फरार झाला होता. फरार झालेला जफर उत्तराखंडमध्ये लपण्यासाठी जागा शोधत होता. जफरने गुरताज सिंह नावाच्या एका व्यक्तीच्या घरात घुसखोरी केली होती. पोलिसांना तो तिथे लपल्याचं कळाल्यानंतर पोलिसांचं एक पथक त्याला पकडण्यासाठी उत्तराखंडमध्ये पोहोचलं होतं.
जफर ज्या घरात लपला होता, त्या घराला पोलिसांना वेढा घातला असता जफरच्या साथीदारांनी आणि स्थानिकांनी पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. पोलीस कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांवर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात 2 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून दोघेजण गायब आहेत. धक्कादायक बाब ही आहे की जफर ज्या घरात लपला होता, त्या घराचे मालक गुरताज सिंह यांची पत्नी गुरमीत कौर यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |