03:14am | Dec 04, 2019 |
खंडाळा : खंडाळा येथील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या केसमध्ये वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पकडण्याचे दिलेला आदेश रद्द करण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण माजी सभापतींच्या मुलासह पाच जणांना खंडाळा न्यायालयाने ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे.
यामध्ये हर्षवर्धन आनंदराव शेळके, मित्तल महिंद्रा शहा, भरत रामचंद्र शेळके, विक्रम उत्तम धायगुडे व संग्राम आनंदराव शेळके असे खंडाळा न्यायालयाने ताब्यात घेतलेल्या युवकांचे नाव आहे. यावेळी खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण यांच्यासमोर सदरील केसबाबत सुनावणी सुरु आहे. दरम्यान,प्रलंबित केसमध्ये तारखांना संबंधित वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुध्द पकडण्याचे आदेश बजावले होते. यावेळी पोलीसांनी पकडण्याचे आदेशांची बजावणी केल्यानंतर हर्षवर्धन शेळके यांच्यासह पाच युवक न्यायालयामध्ये पकडण्याचे आदेश रद्द करण्याकरीता खंडाळा येथील न्यायालयामध्ये हजर झाले होते. यावेळी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण यांच्यासमोर सुनावणी होत सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत संबंधितांना न्यायाधीश अजित चव्हाण यांनी ताब्यात घेण्याचे आदेश देत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |