बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या सर्वांधिक वजनदार असलेल्या जीसॅट-११ या उपग्रहाचे आज सकाळी युरोपियन अवकाश संस्थेच्या फ्रेंच गयाना येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण आज बुधवारी मध्यरात्री २.०७ वाजता एरियन-५ रॉकेटच्या साह्याने करण्यात आले.
जी सॅट-११ हा उपग्रह सर्वाधिक वजनदार, मोठा आणि अत्याधुनिक असा उपग्रह आहे. त्याचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती 'इस्त्रो'चे चेअरमन के. सिवन यांनी दिली आहे. जीसॅट-११ हा उपग्रह भारताची अवकाशातील श्रीमंत संपत्ती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हा उपग्रह ग्रामीण क्षेत्रातील इंटरनेट क्रांतीसाठी मैलाचा दगड मानला जात आहे. यामुळे देशातील इंटरनेट स्पीड वाढण्यास मदत होणार असल्याचे 'इस्त्रो'ने म्हटले आहे.
हा कम्युनिकेशन उपग्रह ५,८५४ किलो वजनाचा असून तो पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर दूरवर जाणार आहे. उच्च क्षमता असलेला हा उपग्रह पुढील वर्षात देशात प्रत्येक सेकंदाला १०० गीगाबाईट पेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात यामुळे इंटरनेट क्रांती होईल, असे 'इस्त्रो'चे चेअरमन के. सिवन यांनी म्हटले आहे.
जीसॅट-११ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. हे त्यांचे उल्लेखनीय कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |

महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |