03:26pm | Mar 23, 2024 |
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एकीकडे विजयाची शाश्वती नसतानाही अनेकजण तिकीट मिळण्यासाठी फिल्डिंग लावून असताना विजयाची शाश्वती असूनही गुजरातमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे. दोन्ही उमेदवारांनी पक्षाला तिकीट परत केले आहे.
बडोद्याच्या खासदार रंजन भट्ट आणि साबरकांठाहून भीकाजी ठाकुर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले आहे. भट्ट यांनी खासगी कारणांमुळे निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली आहे. भाजपाने त्यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले होते. तर भीकाजी यांच्या जातीवरून वाद सुरु आहे. यामुळे त्यांनी निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले असल्याचे सांगितले जात आहे.
रंजन भट्ट यांनी ट्विटरवरून भाजपाचे तिकीट मागे देत असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात भाजपानेच आंदोलन छेडले होते. भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनीच हे आंदोलन छे़डले होते. याचा उल्लेख करत भट्ट यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले गेले असे म्हटले आहे. मला हायकमांडने काही सांगितलेले नसून मी स्वत: तिकीट परत करत आहे. अशाप्रकारे विरोध होण्यापेक्षा मी निवडणूक न लढवावी हेच चांगले आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
दुसरे उमेदवार भीकाजी ठाकूर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांना स्थानिकांमध्ये भीकाजी डामोर या नावाने ओळखले जाते. तिकीट मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित झाला होता. दोन वेळचे खासदार दीपसिंह राठोड यांचे तिकीट कापून भीकाजी यांना संधी देण्यात आली होती.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |

जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |