02:28pm | Mar 23, 2024 |
इंदापूर : पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागले तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो. धमक्या द्यायचा, पोलिसांचा वापर करायचा. आम्हाला धमक्या देतो आणि घेतोही. धमक्याचा प्रकार बारामतीत सुरू आहे हा डरपोकपणा आहे. धमक्या फोनवर दिल्या जातात, समोरून दिल्या जात नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई, ठाण्याला यायचंय, रस्ता आमचाच आहे. तुम्ही पवारांना धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय, कुणाला धमक्या देताय? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोक नाही. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते पळून गेले. तुमच्यात हिंमत असेल तर प्रचार करून निवडून येऊन दाखवा. ही लढाई बारामतीची नसून महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई आहे. तुमची दादागिरी, दहशतवाद आणि धमक्या, बारामतीचं कुणी गुजरात करू पाहत असेल तर इथं शिवसेनेचा भगवा ठामपणे उभा राहील असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकारणातला माणूस विकासावर बोलतो, कामावर मत मागतो. धमक्या देऊन मते मागतात याचा अर्थ त्यांनी विकास केला नाही असा सरळ अर्थ आहे. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ का येते, कारण लोक तुमच्यासोबत नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी २ पक्ष फोडून आलो, पण ४ महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही ईडी, सीबीआयच्या दहशतीवर पक्ष फोडले. उद्या ही यंत्रणा आमच्या हातात येणार आहे त्यामुळे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पाहा असा इशाराही राऊतांनी फडणवीसांना दिला.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे आमचे मित्र आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शांत झोप लागत नसेल. पण त्यांना स्वाभिमान असेल, मराठी म्हणून अस्मिता असेल. जर महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरु असताना कुठल्याही मराठी नेत्याने आणि माणसाने शांत झोपू नये. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. तु्म्ही या मातीतले मराठी म्हणून म्हणवण्यास लायक नाही. त्यामुळे मैदानात उतरा, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी. त्यांच्या मनातील अस्वस्थता जाणवते असं सांगत संजय राऊतांनी हर्षवर्धन पाटलांना सोबत येण्याचं आवाहन केले.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |