अहमदाबाद : विश्वचषक २०२३ मधील बहुप्रतीक्षित असा क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच भारतीय चाहत्यांना भारतीय संघाने यंदाचा विश्वचषक जिंकावा अशी इच्छा आहे आणि टीम इंडिया या चमकत्या ट्रॉफीपासून अवघे एक पाऊल दूर आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनलसाठी खचाखच भरले असणार आहे. १ लाखांहून अधिक लोकांच्या गर्दीसमोर, रोहित शर्मा आणि संघाला वर्ल्ड कप ट्रॉफी उचलण्याची चांगली संधी असणार आहे. मात्र, दोन्ही संघ सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये असून दोघांमध्ये हाय व्होल्टेज सामन्याची पूर्ण अपेक्षा आहे. चला तर मग जाणून घेऊया फायनलसारख्या मोठ्या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात.
फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
बांगलादेशविरुद्ध हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला तेव्हा भारताचे विजयी संयोजन बिघडणार याची सर्वांनाच भीती वाटत होती. पण हार्दिक संघाबाहेर झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आल्यानंतर जे टीम कॉम्बिनेशन तयार झाले, त्याला खरंच तोड नाही. टॉप ऑर्डर चांगल्या धावा करत आहे. त्यामुळे मोहम्मद शमी वन मॅन आर्मीप्रमाणे स्वतः सर्व विकेट घेत आहे. त्याने ६ सामन्यात २३ विकेट घेत इतिहास रचला आहे. तर शमीसोबत भारताची गोलंदाजी बाजू एकदम मजबूत झाली आहे.
अशा परिस्थितीत, भारतीय संघ अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यात विजयी संयोजन नक्कीच बदलू इच्छित नाही आणि त्याच प्लेइंग इलेव्हनसोबत जाईल ज्याने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. दुसरीकडे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ खूप मजबूत दिसत होता. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियासुद्धा संघात कोणताही बदल न करता त्याच संघासोबत अंतिम सामना खेळण्यासाठी भारताविरुद्ध उतरू शकतो.
फायनलसाठी भारत-ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया-
ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा आणि जोश हेजलवुड
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |