12:35pm | Feb 16, 2024 |
आसाम : शार्दूल ठाकूरने पुनरागमनाच्या सामन्यात वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धींना गुडघे टेकण्यास भाग पाडले. रणजी ट्रॉफी च्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना शार्दूलने १० षटकांत २१ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या आणि प्रतिस्पर्धी आसामचा पहिला डाव लंच ब्रेकच्या आधी ८४ धावांवर गुंडाळला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर शार्दूल क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा नावाचा विचार केला गेला नाही. पण, रणजी करंडक स्पर्धेतून आज त्याने पुनरागमन केले आणि पहिल्याच सामन्यात ६ विकेट्स घेतल्या.
आसामच्या परवेज मुसरफला शार्दूलने चौथ्या षटकात २ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर मोहित अवस्थीने दुसरा सलामीवीर राहुल हजारिकाला बाद केले. शाम्स मुलानीने दोन धक्के देताना आसामचा डाव पोखरून टाकला. त्यानंतर शार्दूलने एकमागून एक धक्के दिले. त्याने एस सी घाडीगावकर ( ४), कर्णधार देनिश दास ( ५), कुणाल शर्मा ( १), सचिन लचित ( २) व दिबाकर जोहोरी ( ०) यांना माघारी पाठवले. तुषार देशपांडेने एक विकेट घेतली. आसामचा संपूर्ण संघ ३२.१ षटकांत ८४ धावांत तंबूत परतला.
शार्दूलने भारताकडून ११ कसोटीत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. ४७ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ६५ आणि २५ ट्वेंटी-२०मध्ये ३३ विकेट्स आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |