11:55am | Feb 06, 2024 |
पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महावितरणच्या २०२३-२४च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान पटकावला. तर कोल्हापूर परिमंडलाने उपविजेते पद मिळविले. पुणे-बारामती परिमंडल संघातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात नेत्रदिपक कामगिरी करीत या स्पर्धेत तब्बल १६ सूवर्ण तर २० रौप्यपदकांची कमाई केली.
छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचा पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका सभागृहात रविवारी (दि. ४) सायंकाळी समारोप झाला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड, संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता श्री. परेश भागवत, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व सहकाऱ्यांनी अजिंक्यपदाचा करंडक स्वीकारला.
महावितरणच्या १६ परिमंडलांच्या ८ संयुक्त संघातील सुमारे १२०० खेळाडूंचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे) व सुनील पावडे (बारामती) यांच्या नेतृत्वात पुणे-बारामती परिमंडल संघाने यंदा क्रीडा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्यात आली. खेळाडूंना प्रशिक्षण देणे, सराव शिबिर आदींचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडास्पर्धेचे समन्वयक तसेच उपमुख्य औद्योगिक अधिकारी शिरीष काटकर (पुणे) व श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांनी खेळाडूंची निवड चाचणी, सराव, प्रशिक्षण शिबिर आदींसाठी महत्वाचे योगदान दिले.
पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक खेळात व्हॉलिबॉल, खोखो (पुरुष) व टेनिक्वाईट (महिला) स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर कबड्डी (महिला), टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम (पुरुष) आणि बॅटमिंटन (महिला) मध्ये उपविजेता ठरले. वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पुणे-बारामती संघाचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे- धावणे १०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), २०० मीटर (महिला)- माया येलवंडे (उपविजेता), ४०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), ४०० मीटर (महिला)- भक्ती लोमटे (उपविजेता), ८०० मीटर (पुरुष)- प्रतिक वाईकर (विजेता), १५०० मीटर (महिला)- अर्चना भोंग (उपविजेता), ५००० मीटर (पुरुष)- प्रतिक वाईकर (उपविजेता), ४ बाय १०० रिले (पुरुष) – गुलाबसिंग वसावे, प्रतिक वाईकर, अक्षय केंगळे, सोमनाथ कंठीकर (विजेते), गोळा फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), थाळी फेक (पुरुष)- अक्षय केंगळे (उपविजेता), थाळी फेक (महिला)- हिना कुरणे (विजेता), भाला फेक (पुरुष)- अक्षय केंगळे (उपविजेता), लांब उडी- पुरुष गट- अक्षय केंगळे (उपविजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेता), कॅरम (पुरुष)- संजय कांबळे (उपविजेता) टेनिक्वाईट- (महिला एकेरी)- अमृता गुरव (उपविजेता), (महिला दुहेरी)- शीतल नाईक, कोमल सुरवसे (विजेते), टेबल टेनिस– पुरुष एकेरी– अतुल दंडवते (विजेता), पुरुष दुहेरी- अतुल दंडवते व दीपर रोटे (विजेता), बॅडमिंटन- पुरुष एकेरी- भरत वशिष्ठ (विजेता), पुरुष दुहेरी – भरत वशिष्ठ व सुरेश जाधव (उपविजेता), महिला एकेरी- वैष्णवी गांगरकर (उपविजेता), महिला दुहेरी- वैष्णवी गांगरकर व कमल दारूखानवाला (उपविजेता), कुस्ती - ६५ किलो- राजकुमार काळे (विजेता), ७४ किलो- चंद्रकांत दरेकर (उपविजेता), ९२ किलो- अमोल गवळी (विजेता), ९७ किलो- महेश कोळी (विजेता).
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवले. मुख्य अभियंता राजेंद्र पवार, उपमुख्य औद्योगिक अधिकारी शिरीष काटकर व श्रीकृष्ण वायदंडे यांनी अजिंक्यपदाचा करंडक स्वीकारला. यावेळी संचालक अरविंद भादीकर, पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |