02:12am | Feb 03, 2020 |
खंडाळा : शिरवळ शहर बंद पुकारून नागरिकांना, व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अपप्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिरवळ ग्रामस्थांनी शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांना लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिरवळ शहर हे ऐतिहासिक व अौद्योगिक दृष्ट्या प्रगत होत असून खंडाळा तालुक्यात एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे. याठिकाणी सर्वधर्मसंमभावनांची जोपासना नेहमीच केली जात आहे. एकमेकांच्या सुखदुःखात शिरवळकर नागरिक हे नेहमीच सहभागी होत असतात. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून काही अपप्रवृत्तीकडून या परंपरेला छेद देण्याचे काम शिरवळमध्ये सुरू आहे. येथील टी. ई. कनेक्टिव्हीटी या कंपनीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावरून सामंजस्याने शिरवळ ग्रामपंचायतीमार्फत चर्चेच्या माध्यामातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू असताना येथील अपप्रवृत्तीकडून व्यापाऱ्यांना वेठीस धरून शिरवळ बंदची हाक सोशल मिडियावर काही तथाकथितांकडून होत आहे.शिरवळमध्ये त्यांच्या हस्तकांकरवी याबाबतचे पत्रके वाटून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून सुरू आहे. तरी अशा संबधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी व व्यापाऱ्यांना बंदच्या नावाखाली वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा. या निवेदनावर उपसरपंच सुनिल देशमुख, शिवसेना शिरवळ शहरप्रमुख विजय गिरे, काॅग्रेसचे शिरवळ शहर प्रमुख शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे शिरवळ शहर प्रमुख चंद्रकांत मगर, आरपीआयचे दादासाहेब कांबळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष समीर काझी यांच्या सह्या आहेत.
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |