07:29pm | Apr 15, 2020 |
सातारा : लोणंद, ता. खंडाळा येथे असलेल्या महावितरण वीज कंपनीच्या सबस्टेशनला आज सकाळी अचानक मोठी आग लागली. सबस्टेशनला आग लागल्याने त्वरित परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या भीषण आगीला विझवण्यात यश आले असून लोणंद तसेच फलटण तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी सुमारे काही तासांपेक्षा जास्त काळ लागू शकतो, अशी माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, लोणंद येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला बुधवारी सकाळी मोठी आग लागली. या आगीमुळे खंडाळा तसेच फलटण तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आग लागली असतानाच सुमारे पंधरा ते वीस मिनिटे स्फोटांसारखे आवाज येत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये मोठी घबराट पसरली होती. सबस्टेशनला लागलेली आग सुमारे पाच किलोमीटरवरील लोकांनाही दिसून येत होती. आगीला आटोक्यात आणण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तसेच पोलीसांनीही घटनास्थळी जावून प्रयत्नांची पराकाष्टा केली. फलटण तसेच लोणंद येथील नगरपालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचले होते. आज दुपारी मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. तसेच जिल्ह्यात संचार व जबावबंदी आदेशही पारित करण्यात आले आहेत. असे असतानाही बघ्यांनी नियम, कायदा धाब्यावर बसवून घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी लोणंद पोलिसांनी त्वरित पांगवली. दरम्यान, लोणंद येथील 132 केव्ही सबस्टेशनच्या मुख्यालयात झालेल्या या बिघाडामुळे जिल्ह्यातील खंडाळा तसेच फलटण तालुक्यातील विज वितरणवर परिणाम होणार आहे. पोलीस तसेच महावितरणच्या कर्मचारी-अधिकार्यांनी ही आटोक्यात आणली असली तरी विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही तासांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे.
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |