बदलत्या हवामानाचा फटका कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्यांना जास्त होतो. अशावेळी सर्दी, खोकला, ताप, यासह विविध आजारांचा त्रास मोठ्यांसह लहानग्यांना होतो. कमजोर इम्यूनिटीमुळे आपण वारंवार आजारी पडतो. बरेच लहान मुलं हवामानात बदल असो, किंवा प्रदूषण यामुळे लवकर आजारी पडतात. आता लवकरच उन्हाळा सुरु होईल. सध्या वातावरण काहीसं गरम काहीसं थंड आहे. ज्यामुळे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे; ते लोकं लवकर आजारी पडतात.
लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी यासह त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी त्यांना हमखास ३ पदार्थ न चुकता खायला द्या पाल्यांना नेमके कोणते पदार्थ खायला द्यावे, याची माहिती आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. डिंपल जांगड़ा यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.
लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना खायला द्या ३ पदार्थ
मध :
मध खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात अँटी-एलर्जिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ऍलर्जी, दमा, ताप, श्वास घेण्यात अडचण, यासह इतर समस्या दूर होतात. जर मुलांना वारंवार सर्दीचा त्रास होत असेल तर, त्यांना मध खायला द्या. यामुळे नाक, घसा आणि छातीतील कफ पातळ होतो. पालकांनी २ वर्ष वयोगटातील मुलांना अर्धा चमचा मध तर, ३ ते १४ वर्षाहून अधिक वयोगटातील मुलांना एक चमचा मध खायला द्यावे.
पुदिन्याची पानं आणि बडीशेप :
लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर, त्यांना आपण एक काढा तयार करून देऊ शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात अर्धा चमचा बडीशेप, पुदिन्याची पानं, दालचिनी, आलं पावडर, हळद, लवंग घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पुदिना श्वासनलिकांसंबंधी कमी करण्यास मदत करते. शिवाय बडीशेपेमुळे पचनक्रिया सुधारते.
हेल्दी स्नॅक्स :
बरेच मुलं उलट-सुलट पदार्थ, जंक फूड आवडीने खातात. पण बदलत्या हवामानात त्यांना जंक फूडपासून लांब ठेवा. त्यांना स्नॅक्स म्हणून ड्रायफ्रुट्स, खजूर, हेल्दी प्रोटीन बार, यासह इतर हेल्दी पदार्थ खायला द्या. या पदार्थांमुळे अधिक वेळ भूक लागणार नाही. शिवाय आरोग्यही सुधारेल.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |